RSI म्हणजे काय? कसे वापरावे? २०२५ मधील सर्वोत्तम ट्रेडिंग इंडिकेटर

RSI संकेतक (Relative Strength Index) हा तांत्रिक विश्लेषणातील एक शक्तिशाली साधन असून तो बाजारातील खरेदी–विक्रीच्या तीव्रतेचा आकलन करून ओव्हरबॉट व ओव्हरसोळ्ड क्षेत्रे ओळखायला मदत करतो.
या लेखात आपण RSI चे गणितीय सूत्र, त्याची व्याख्या व चार्टवर योग्य संकेत कसे वाचायचे ते सोप्या पद्धतीने पाहणार आहोत.

trading

आरएस इंडिकेटर (रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडिकेटर / RS Indicator) म्हणजे काय?

 शेअर बाजारात ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करताना तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) हे एक महत्त्वाचे साधन ठरते. अशा वेळी काही विशिष्ट तांत्रिक निर्देशांक (Indicators) वापरले जातात, जे बाजारातील ट्रेड, किंमत चढ-उतार यांचा अंदाज लावायला मदत करतात. हा निर्देशक १९७८ साली जे. वेल्स वाइल्डर (J. Welles Wilder) यांनी तयार केला

रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडिकेटर काय आहे?

रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडिकेटर हे एक मोमेंटम ऑसिलेटर (Momentum Oscillator) आहे, जे किमतीमधील बदलांचा वेग आणि दिशा मोजते.जो शेअरची किंमत अतिखरेदी (Overbought) किंवा अतिकम विक्री (Oversold)स्थितीत आहे का, हे सांगतो.

आरएसआय स्केल:

RSI
  • आरएसआयचे मूल्य ० ते १०० दरम्यान असते.
  • ७० च्या वर: अतिखरेदी स्थिती – म्हणजे किंमत खूप वाढली आहे, आणि आता घसरण होऊ शकते.
  • ३० च्या खाली: जास्त विक्री स्थिती – म्हणजे किंमत खूप घसरली आहे, आणि आता वाढ होण्याची शक्यता आहे.

RSI चा उपयोग करून, व्यापारी (Traders) खरेदी आणि विक्रीचे योग्य निर्णय घेऊ शकतात. 

उदाहरण:

जर एखाद्या समभागाचा आरएसआय ८०आहे, तर याचा अर्थ असा होतो की, समभाग जास्त खरेदी केला गेला आहे आणि त्याची किंमत लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, ट्रेडिंग करणारा व्यक्ती/व्यापारी तो समभाग विकण्याचा विचार करू शकतात.

शेअर बाजारात आरएसआय चा वापर:

RSI

आरएसआय हे एक लोकप्रिय तांत्रिक विश्लेषण साधन आहे आणि त्याचा उपयोग अनेक ट्रेडर्स / व्यापारी करतात. आरएसआयचा उपयोग करून, ट्रेडर्स / व्यापारी बाजारपेठेतील (Market) संभाव्य ट्रेंड रिव्हर्सल (Trend Reversal) ओळखू शकतात.

उदाहरणार्थ, जर आरएसआय  वाढत्या ट्रेंडमध्ये ७०च्या वर गेला आणि नंतर खाली येऊ लागला, तर याचा अर्थ असा होऊ शकतो की, तेजीचा ट्रेंड संपत आला आहे आणि मंदीचा ट्रेंड सुरू होण्याची शक्यता आहे.

आरएसआय(RSI) कसा मोजला जातो?

आरएसआय मोजण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी सर्वसाधारणपणे वापरला जातो. त्याचा सूत्र (Formula) खालीलप्रमाणे आहे:

आरएस इंडिकेटर=१०० – [१०० / (१+आरएस)]

RSI = 100 – [100 / (1 + RS)]

Rs = (n दिवसांचा सरासरी फायदा)/(n दिवसांचा सरासरी नुकसान)

RS = (Average Gain of n days) / (Average Loss of n days)

इथे *n* म्हणजे दिवसांची संख्या (बहुधा १४).

आरएसआयचे फायदे:

1.खरेदी-विक्री सिग्नल:-  आरएसआय ३० च्या खाली गेल्यास खरेदीचा सिग्नल मिळतो, तर ७० च्या वर गेल्यास विक्रीचा सिग्नल मिळतो.

2.मोमेंटम ओळखणे:-  बाजारातील वेग (momentum) समजायला मदत होते.

3.डायव्हर्जन्स शोधणे:– किंमत आणि आरएसआय वेगळ्या दिशांना जात असल्यास भविष्यातील ट्रेंड बदलाचा संकेत मिळतो.

RSI चे अर्थ लावणे:

  •  जर आरएसआय ७०च्या वर असेल, तर तो overbought म्हणजेच शेअरची किंमत खूप वाढली असून आता ती घसरण्याची शक्यता आहे, असे संकेत देतो.
  • जर आरएसआय ३०च्या खाली असेल, तर तो *oversold* म्हणजेच शेअर खूप विकला गेला असून आता किंमत वाढू शकते, असे संकेत मिळतात.

म्हणजेच आरएसआय गुंतवणूकदाराला हे सांगतो की, एखाद्या शेअरमध्ये सध्या खरेदी करणे योग्य आहे की विक्री योग्य आहे हे ठरवता येते.

RSI चा उपयोग कसा करावा?:

1. ट्रेंडची पुष्टीजर एखादा शेअर अपट्रेंडमध्ये असेल आणि आरएसआय  ४०-७०च्या दरम्यान असेल, तर तो ट्रेंड मजबूत आहे असे मानले जाते.

2. डायव्हर्जन्स (Divergence):  जर किंमत वाढत असतानाही आरएसआय कमी होत असेल, तर ते bearish divergence दर्शवते, आणि किंमत कमी होण्याची शक्यता असते. उलट परिस्थिती bullish divergence दर्शवते.

3. ब्रेकआउट कन्फर्मेशन:  आरएसआय  काही वेळा ब्रेकआउट्स किंवा ब्रेकडाऊन्सचे संकेत दर्शवतो.

# RSI च्या मर्यादा:

जरी RSI उपयुक्त निर्देशक असला तरी तो एकटाच वापरणे धोकादायक ठरू शकते. कारण काही वेळा बाजारात “अयोग्य संकेत” येऊ शकतात. म्हणूनच RSI बरोबर (MACD, Moving Averages किंवा Bollinger Bands) यासारखे इतर निर्देशक वापरणे अधिक योग्य ठरते.

वापरण्याबद्दल सल्ला:

RSI हा ट्रेडर्ससाठी एक शक्तिशाली साधन आहे. तो बाजारातील भावनांचा अंदाज लावण्यास मदत करतो आणि योग्य वेळेस निर्णय घेण्यास सहाय्यक ठरतो. मात्र, कोणताही निर्देशक अचूक भविष्यवाणी करू शकत नाही. त्यामुळे RSI चा वापर करताना विचारपूर्वक आणि इतर घटक लक्षात घेऊनच गुंतवणूक करावी.

निष्कर्ष:

आरएसआय(RSI) हा ट्रेडर्ससाठी एक उपयुक्त तांत्रिक साधन आहे. तो बाजारातील ट्रेंड, खरेदी-विक्री संधी ओळखण्यासाठी मदत करतो. मात्र, तो एकटाच वापरू नये. बाजारातील इतर संकेत देणारे इंडिकेटर व मूलभूत माहिती यांचाही विचार करणे आवश्यक आहे.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

अस्वीकरण: येथे दिलेली माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने आहे आणि ती गुंतवणूक सल्ला, शिफारस किंवा कोणत्याही सिक्युरिटीज खरेदी किंवा विक्रीची ऑफर नाही. सर्व गुंतवणूक धोरणे आणि गुंतवणुकींमध्ये तोटा होण्याचा धोका असतो. कोणतेही गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी व्यक्तींनी स्वतःचे संशोधन करावे किंवा आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. लेखक/प्रकाशक नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार नाहीत आणि प्रदान केलेल्या माहितीच्या आधारे झालेल्या कोणत्याही व्यापार नुकसानाची जबाबदारी स्वीकारत नाहीत. मागील कामगिरी भविष्यातील परिणामांचे सूचक नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top